
दोडामार्ग : कसई दोडामार्ग पिंपळेश्वर चौक येथे वारवार होणारे अपघात लक्षात घेता. नगरध्यक्ष चेतन चव्हाण व मित्रमंडळ यांनी गती रोधकाची मागणी सार्वजनिज बांधकाम विभागाकडे केली होती. त्यानुसार आज शुक्रवारी गती रोधक घालण्यात आले. दोडामार्ग पिंपळेश्वर चौक येथे चारही बाजूने येणाऱ्या वाहनामुळे वारंवार मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. या दृष्टीने कसई दोडामार्ग नगरपंचायतचे नगरध्यक्ष चव्हाण व नगरसेवकांनी सार्वजनिक बांधकाम विभागकडे गती रोधक घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार दोडामार्ग आयी रस्त्यावर पिंपळेश्वर देवस्थानच्या बाजूला तर गोवा रस्तावर वर्षा मेडिकल च्या समोर गतिरोधक घालण्यात आले.










