न. प. च्या १०० मीटरवर मिनी कचरा डेपो ?

नगरसेवक सुर्याजींचे गंभीर आरोप
Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2026 15:11 PM
views 180  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या १०० मीटर अंतरावर असलेल्या भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'मिनी कचरा डेपो' इथे तयार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून तातडीने यावर कार्यवाही करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. 

नगरसेवक श्री. सुर्याजी म्हणाले,  बाजारपेठेलगत सालईवाडा येथील वर्दम, नेवगी, भांबुरे घरामागील असणाऱ्या ओहोळावरील रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. येथील रहिवाशांच्या खाजगी जागेत देखील कचरा टाकला जात आहे. मिनी कचरा डेपो येथे तयार झाला असून प्लास्टिक व कचऱ्याच साम्राज्य निर्माण झाले आहे. आरोग्य प्रशासनाने यावर ठोस पाऊल उचलून यापुढे इथे कचरा टाकला जाणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी केली.तसेच दैवज्ञ गणपती मंदीर मागील बाजूस ड्रेनेजच पाणी साचून राहत आहे‌. गटार नसल्याने डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या गटाराच काम करून ते बंदीस्त करण्यात यावे व ड्रेनेजच पाणी साचून राहणार नाही यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ॲड प्रथमेश प्रभू उपस्थित होते.