
कुडाळ : निवजे येथील ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आनंद परब यांनी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले. याप्रसंगी महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सचिव दादा साईल, व्हि. जे. एन. टी. महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुका प्रमुख विनायक राणे, तालुकाप्रमुख दीपक नारकर, वेताळ बांबर्डे विभाग प्रमुख नागेश आईर, शिवसेना मागासवर्गीय तालुकाप्रमुख विजय जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.










