
सावंतवाडी: पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील श्रीकांत शशीमोहन खोत राह. सांगेली, यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मातीचा ढीग टाकून त्यांचा जाण्याचा मार्ग अडवल्याने तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दीपक कुबल राहणार सांगली यांचे विरुद्ध जाणा-याण्याचा रस्ता अडवल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्र उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलीस हवालदार महेश जाधव यांनी करून घटनास्थळाची पाहणी केली असून अधिक तपास तपास पोलीस हवालदार मंगेश शिंगाडे हे करीत आहेत अशी माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.










