
सावंतवाडी : विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना 2024- 25 अंतर्गत बस स्टँड ते लाडाची बाग, लतिफ बेग ते हॉटेल सागर पंजाब पर्यंत बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट पोलचा शुभारंभ नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला.
एकूण 60 पोल या भागात बसविण्यात आले असुन या मुळे या भागाला नवा लूक प्राप्त झाला आहे. याचा शुभारंभ युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी केला. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, नगरसेवक देवा टेमकर, ॲड. सायली दुभाषी, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, प्रतिक बांदेकर, संदेश टेमकर आदी उपस्थित होते.










