
सावंतवाडी : शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारांचे नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून देऊन आम्हाला आशीर्वाद दिलेत. त्यामुळे या निवडणुकीत नागरिकांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार, असा विश्वास राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात आम्ही महायुती म्हणून एकत्र असून जिल्ह्यातही आम्ही महायुती म्हणूनच पुढे जात आहोत. आगामी जिल्हा परिषद निवडणूक तसेच नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष व सभापती निवडीबाबत प्राथमिक स्तरावर आजच शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्याशी एकत्रित बैठकीत चर्चा झाली. स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते व नगरसेवकांना विश्वासात घेऊन याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आरोग्यासह पाण्याचा महत्त्वाचे विषय जाणून घेतले असून त्यासंदर्भात जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आवश्यक असलेला सर्व निधी उपलब्ध करून नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व समस्या दूर केल्या जातील, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा पालकमंत्री नितेश राणे यांनी सन्मान करीत यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून आगामी पाच वर्षाच्या कार्यकाळात करण्यात येणाऱ्या विकास प्रक्रियेबाबत माहिती दिली. सुरुवातीलाच त्यांनी सावंतवाडीकर नागरिकांचे आभार मानत या निवडणूक प्रक्रियेत विशेष मेहनत घेणाऱ्या युवराज लखमराजे भोंसले यांचे कौतुक केले तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले मेहनतीचा विजय असल्याचे त्यांनी यावेळी विशद केले.
यावेळी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत -भोसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश सारंग, शहर अध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक सुधीर आडीवरेकर, महिला शहर अध्यक्ष नगरसेविका मोहिनी मडगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, ॲड. अनिल निरवडेकर, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, निलम नाईक, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर, वीणा जाधव यांच्यासह माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, राजू बेग, उदय नाईक, प्रमोद गावडे, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, ॲड. संजू शिरोडकर, ॲड. रुजूल पाटणकर, महेश धुरी, दिलीप भालेकर, अमेय पै, हितेन नाईक, सुधाकर राणे, अमित गवंडळकर, गणेश पडते, विराग मडकईकर, संजय शिरसाट आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.










