नेमळेत डबल बारीचं संदीप गावडे यांच्या हस्ते उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: December 29, 2025 19:13 PM
views 14  views

सावंतवाडी : जय गणेश मित्रमंडळ नेमळे येथे केएसाआर ग्लोबल एक्वेरियम यांच्या माध्यमातून आयोजित डबल बारी कार्यक्रमाचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भजन हे अध्यात्म आणि संगित याचा एक उत्तम संगम आहे. आपली संस्कृती, अध्यात्म हे भजन च्या माध्यमातून पूर्वीपासून जपले जात आहे. असे गावडे म्हणाले. यावेळी या कार्यक्रमासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक ॲड. अनिल निरवडेकर, युवा मोर्चा आंबोली मंडल सरचिटणीस विघ्नेश मालवणकर, नेमळे गावातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.