भाजप व शहर विकास आघाडीतर्फे गटांची नोंदणी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 29, 2025 19:54 PM
views 17  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतीमधील सत्ताधारी शहर विकास आघाडी व विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आपल्या गटांची नोंदणी सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. शहर विकास आघाडीच्या गटनेतेपदी रुपेश नार्वेकर तर भाजपच्या गटनेतेपदी सुप्रिया नलावडे यांची निवड त्यांच्या गटातर्फे करण्यात आली. 

कणकवली नगरपंचायतीमध्ये भाजपचे नऊ नगरसेवक निवडून आले असून या सर्व नगरसेवकांच्या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कणकवली नगरपंचायत भाजपा गट असे नाव या गटाला देण्यात आले असून या गटामध्ये नगरसेवक राकेश राणे, स्वप्निल राणे, संजय कामतेकर, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, मेघा गांगण व गटनेता सुप्रिया नलावडे यांचा समावेश आहे.

कणकवली नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीचे आठ नगरसेवक निवडून आले असून या सर्व नगरसेवकांच्या गटाची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली‌ शहर विकास आघाडीतर्फे देखील जिल्हाधिकार्‍यांना पत्र देत नोंदणी प्रक्रिया करण्यात आली. कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडी असे गटाला नाव देण्यात आले असून गटामध्ये नगराध्यक्ष संदेश पारकर, जयश धुमाळे, सुमेधा अंधारी, जाई मुरकर, संकेत नाईक, सुशांत नाई,क लुकेश कांबळे, वैष्णवी सरमळकर (दीपिका जाधव) व गटनेता रुपेश नार्वेकर यांचा समावेश आहे.