
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा आंबडपाल या शाळेमध्ये सर्व ग्रामस्थ पालक सरपंच उपसरपंच पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक यांनी सहभाग दर्शवून शाळेचे मुख्याध्यापक संजय बगळे यांची बदली रद्द करावी यासाठी आज सोमवारी शाळा बंद करून शाळेच्या आवारात ठीय्या आंदोलन केले.
आंदोलनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या आंदोलनात शाळा समिती अध्यक्ष सुरेश तानावडे भगवान सावंत महेश मेस्त्री, पोलीस पाटील सचिन सावंत सखाराम आंबडपालकर, संतोष सावंत तानाजी सावंत दिनकर सावंत सचिन सावंत रामा सावंत विलास सावंत, मानसी सावंत सान्वी सावंत, सही मेस्त्री संजना सुपल, प्रांजल चव्हाण अनुष्का सावंत नम्रता सावंत आदी ग्रामस्थ यात सहभागी झाले होते याबाबतसुरेश तानावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेचे मुख्याध्यापक संजय बगळे हे रजा संपल्यानंतर शाळेत हजर झाले त्यावेळीप्रभारी मुख्याध्यापकांनी बगळे यांना या शाळेत हजर होता येणार नाही असे प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तोंडी सांगितल्याचे सांगितले याबाबत ग्रामस्थांनी लेखी मागितले मात्र लेखी दिले नाही त्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी आज सोमवारी शाळा बंद ठेवून आंदोलन सुरू केले.
एकाही मुलाला शाळेत पाठवले नाही आणि पालक ग्रामस्थ यांनी शाळेच्या आवारात ठिय्या मांडला दरम्यान प्रभारी गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही न्यायप्रविष्ठ असल्याने आपण निर्णय घेऊ शकत नाही याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे सांगितले मात्र दिवसभर ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवून आंदोलन सुरू ठेवले.










