
सावंतवाडी : महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा पुरस्कार रेडी सरपंच रामसिंग राणे यांना प्राप्त झाला असून, पत्रकार भवन,पुणे येथे हा सन्मान सोहळा पार पडला. या गौरव पुरस्कार कार्यक्रमात क्रीडा, शैक्षणिक,राजकीय, सामाजिक,व्यावसायिक व इतर क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांची नालंदा ऑर्गनायझेशनचे ग्रामसमृध्दी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने "ग्रामसमृद्धी सन्मान २०२५" ने त्यांना सन्मानित करण्यात आले.
या सन्मानामुळे रेडी सरपंच रामसिंग राणे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस सर्वांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.










