
सावंतवाडी : भालावल ग्रामपंचायतीच्यावतीने गावातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने एक पाऊल पुढे येत, गावाच्या हितासाठी 'प्लास्टिक द्या, झाडे घ्या' हा अभिनव उपक्रम राबविण्यात सुरुवात केली आहे. सध्या प्लास्टिक मुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, या प्लॅस्टिकवर उपाय म्हणून "प्लास्टिक द्या झाडे घ्या" हा उपक्रम अंमलात आणल्याचे सरपंच समीर परब यांनी सांगितले.
गावातील हितासाठी ग्रामपंचायत मार्फत असे विविध प्रकारचे उपयुक्त ठरणारे उपक्रम राबविले जातील असेही त्यांनी सांगितले. प्लॅस्टिकमुळे माणसांचे आरोग्य ,प्राणी,पक्षी,जनावरे,जमीन यावर विपरीत परिणाम होत असून यावर उपाय म्हणून प्लास्टिक द्या झाडे घ्या हा उपक्रम सुरू केला आहे.या उपक्रमामुळे गावातील प्लास्टिक वापर कमी होईल तसेच झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश ही नागरिकांपर्यंत पोहचण्यात मदत होणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती राणे यांनी सांगितले. गावातील नागरिकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.










