RPD त ‘स्नेहसंगम’ उत्साहात

रंगावली प्रदर्शन - हस्तकला प्रदर्शनाचं उद्घाटन
Edited by: विनायक गांवस
Published on: December 23, 2025 20:40 PM
views 19  views

सावंतवाडी : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीचा ‘स्नेहसंगम’ हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभास प्रारंभ झाला. संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी रंगावली प्रदर्शन व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मानस अंकाचे प्रकाशन करण्यात आले. 

सुरुवातीला स्व. विकास सावंत यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन प्रा. दशरथ राजगोळकर, निवृत्त मुख्याध्यापक पी.एम. सावंत, आदर्श शिक्षकेतर गुणवान पुरस्कारान अर्जुन गवंडी तसेच डॉ. दिनेश नागवेकर पुरस्कृत प्राचार्य ज. बा. शिरोडकर आदर्श विद्यार्थी व विद्यार्थिनी पुरस्कार उत्कर्ष आदारी, आस्था लिंगवत, योगेश जोशी, वैष्णवी गावडे, शुभम  शिरोडकर, श्रावणी सावंत, चिन्मय असनकर, अदिती राजाध्यक्ष, ओंकार गवस, श्रेया गवस, सानिका ठाकुर, दीप राऊळ, ऋतुजा नाईक, प्रणिता आयरे, स्वप्नील लाखे, वैभव निकम, तन्वी काणेकर यांना प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून भाषण करताना विक्रांत सावंत म्हणाले, स्व. विकास सावंत यांच स्मरण सदैव होत. त्यांनी उणीव पावला पावलावर भासते. आमची ताकद शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आहेत. या शाळेचा, कॉलेजचा श्वास ते आहेत. स्व. भाईसाहेब सावंत यांचा वारसा अन् स्व. विकास सावंत यांची शिकवण घेऊन कार्यरत राहणार विद्यार्थांना चांगल्या सुविधा संस्था म्हणून देणार असून पुढील वर्षीपासून स्व. विकासभाई सावंत आदर्श पुरस्कार दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. यावेळी सचिव माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांनी मनोगत व्यक्त करताना स्व. विकास सावंत यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच प्रा. शैलेश नाईक, वसुधा मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत यांनी शुभेच्छा संदेश दिला. यावेळी संस्थाध्यक्ष विक्रांत सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, अमोल सावंत, प्रा. सतिश बागवे, च.मु. सावंत, संदीप राणे, वसुधा मुळीक, छाया सावंत, स्नेहा परब, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, पर्यवेक्षक नामदेव मुठे, उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. संजना ओटवणेकर, माध्यमिक सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम .प्रिती सावंत, विद्यार्थी प्रतिनिधी कु. सोहम पालव, कु. सानिका ठाकूर, सांस्कृतिक प्रमुख कु. ओंकार चव्हाण, मुख्यमंत्री कु. शुभम वरक, विद्यार्थिनी प्रतिनिधी कु  प्रांजली कबरे, सांस्कृतिक प्रमुख भक्त रजपूत आदी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक-धुरी, प्रा. मिलिंद कासार, सौ. कौचरेकर यांनी केल.