
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका भंडारी मंडळातर्फे प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणाऱ्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते तर नवनिर्वाचित नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या एकंदरीतच वाटचालीचे कौतुक करीत मंडळाला शुभेच्छा दिल्या. तसेच मंडळाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिनदर्शिका निर्मितीमध्ये मोलाचे योगदान देणारे मंडळाचे उपाध्यक्ष हनुमंत पेडणेकर यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, देवेंद्र टेमकर, देव्या सुर्याजी, सुनिता पेडणेकर, मंडळाचे उपाध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, हनुमंत पेडणेकर, महिला अध्यक्षा शितल नाईक तसेच कार्यकारिणी सदस्य नंदकिशोर कोंडये, राजेंद्र बिर्जे, सुधीर पराडकर. निलेश कुडव, भरत कांबळी, संतोष वैज, सिद्धार्थ पराडकर, नामदेव साटेलकर, सुरेश राऊळ, गुंडू साटेलकर, चंद्रकांत वाडकर, नारायण मसुरकर, लवु कुडव यांच्यासह पदाधिकारी महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.










