
सावंतवाडी : शिरोडा मार्गावरील न्हावेली गावात मुख्य रस्त्यावर शाळेसमोर तसेच अन्य दोन धोकादायक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेगरोधक (रम्बलिंग) पट्टे घालण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
या रस्त्यावर वेगात धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने स्पीड ब्रेकर व संरक्षक भिंत उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. न्हावेली उपसरपंच तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख अक्षय पार्सेकर यांच्या पुढाकाराने माजी सरपंच शरद धाऊसकर, ग्रामपंचायत सदस्य तथा उपविभाग प्रमुख सागर धाऊसकर, माजी उपसरपंच विशाल गावडे यांच्यासह निलेश परब, राज धवन, प्रथमेश नाईक, ओम पार्सेकर, दीपक पार्सेकर, अनिकेत धवन, विठ्ठल परब, अमोल पार्सेकर, सिद्धेश धवन, पुनीत नाईक, सौरभ पार्सेकर, तुकाराम पार्सेकर, प्रथमेश आरोंदेकर, वेद मयेकर, रोहीत निर्गुण, कृणाल पार्सेकर, यश पार्सेकर, चेतन पार्सेकर, रुपेश पार्सेकर, ओमकार न्हावेलकर आदींनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने शाळेसमोर व अन्य धोकादायक ठिकाणी वेगरोधक पट्टे बसविले. यामुळे वाहनांचा वेग कमी होऊन विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची सुरक्षितता वाढणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. तसेच निधी उपलब्ध झाल्यानंतर संरक्षक भिंत बांधून देण्याचे आश्वासनही बांधकाम विभागकडून देण्यात आले आहे असे न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सांगितले आहे. या कामासाठी सहकार्य केल्याबद्दल सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले व सहाय्यक अभियंता प्रमोद लोहार यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.










