सावंतवाडी : येथील रहिवासी व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे निवृत्त ग्रामसेवक गोकुळदास मंगेश शिरसाट ( वय ७७) यांचे दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी बांबोळी गोवा हॉस्पीटल मध्ये निधन झाले. शश सेवा निवृत्ती नंतर ते सामाजिक कार्यात आघाडीवर असायचे. पाले गोवा येथील श्री महालक्ष्मी देवस्थानच्या कार्यकारी समितीवरही ते कार्यरत होते. शिवसेनेच्या उमेदवार सौ.हर्षा जाधव यांचे ते वडील होत. स्व. गोकुळदास यांची अंत्ययात्रा दिनांक २० रोजी सकाळी ७ वाजता वैश्यवाडा येथील निवासस्थानावरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुली, जावई, नात, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे.










