
सावंतवाडी : 53 व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण तसेच प्रदर्शनाचा समारोप सोहळा मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी मध्ये गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात दिमाखात पार पडला. विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी व गणित हा विषय केंद्रबिंदू ठेवून या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
बक्षीस वितरण व समारोपाच्या कार्यक्रमाला यावेळी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी सावंतवाडी तथा प्रशासक नगर परिषद सावंतवाडी समीर घारे,सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम.कविता शिंपी,जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग उपशिक्षणाधिकारी अफसरी बेगम आवटी,उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग फारुकी, सावंतवाडी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सविता परब, सावंतवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सावंतवाडी चर्चचे प्रमुख धर्मगुरू तसेच प्रशालेचे मॅनेजर फादर मिलेट डिसोजा, मिलाग्रीस प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण करण्यात आले.
मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री पांडुरंग काकतकर यांनी केले.मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री दत्ताराम नाईक व श्रीम. शारदा गावडे यांनी केले तर आभार प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीम.संध्या मुणगेकर यांनी मानले.
विज्ञान प्रदर्शनाचा निकाल पुढीलप्रमाणे
निबंध स्पर्धा प्राथमिक विभाग
प्रथम -वैदेही संदीप फोंडके- न्यू इंग्लिश स्कूल हेत वैभववाडी, द्वितीय वेदा प्रवीण राऊळ -यशवंतराव भोसले इंग्लिश स्कूल चराटे सावंतवाडी,तृतीय - नेहा कृष्णा लाड-डिगस माध्यमिक विद्यालय कुडाळ.
निबंध स्पर्धा माध्यमिक विभाग-
प्रथम- पर्णीका हनुमंत नाईक- कुडाळ हायस्कूल कुडाळ,द्वितीय- वेदिका दीपक तेली-कासार्डे माध्यमिक विद्यालय कासार्डे, तृतीय- चैतन्य भगवान भोगले -आर पी बागवे हायस्कूल मालवण.
वक्तृत्व स्पर्धा प्राथमिक गट-
प्रथम- आदित्य देविदास प्रभूगावकर -अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल मालवण,द्वितीय -मुग्धा मंगेश मेस्त्री -शे.म.वि. केसरकर वाडगाव कणकवली, तृतीय -दिया संदीप साटम -उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगड.
वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक गट-
प्रथम -श्रावणी राजेंद्र आरावंदेकर -वेतोरे हायस्कूल वेंगुर्ला,द्वितीय- वेदांत शिवप्रसाद नाईक-टोपीवाला हायस्कूल मालवण, तृतीय -रेश्मा संदेश पालव- राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी.
प्रश्नमंजुषा स्पर्धा प्राथमिक गट-
प्रथम- हर्ष सुधीर टेमकर,
शौर्य दत्तप्रसाद परब-सरंबळ इंग्लिश स्कूल
द्वितीय- वेदा विनय सांगळे,
जीविका धाकू सांडव-सेंट उर्सुला हायस्कूल वरवडे.
तृतीय -आयुष ऋषिकेश गावडे,नेस्टर रुजारियो फर्नांडिस-मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी.
प्रश्नमंजुषा माध्यमिक गट -
प्रथम- आर्या रावजी राणे,
जानवी विश्वास पाटील- राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी,
द्वितीय -आयान अमजद शेख,
सिद्धेश गणेश तांबे- कणकवली कॉलेज कणकवली,
तृतीय -सुप्रिया सुनील सरप,
वैष्णवी योगेश्वर सोमण-वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव.
विद्यार्थी प्रतिकृती प्राथमिक गट-
प्रथम- चिदानंद चंद्रशेखर रेडकर-मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी, द्वितीय -मानवी विष्णू घाडीगावकर -प्रगत विद्यामंदिर रामगड, तृतीय- ध्रुव योगेश गोळम -उमा मिलिंद पवार इंग्लिश मीडियम स्कूल देवगड.
विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक गट-
प्रथम -ओमतेज उल्हास तारी -प्रगत विद्यामंदिर रामगड, द्वितीय -ओम चंद्रशेखर आंबेरकर-अ.शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवण,तृतीय -गौरेश मुकेश काडगे- विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली.
दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती प्राथमिक गट -
प्रथम -समृद्धी गुरुनाथ चव्हाण- प्रगत विद्यामंदिर रामगड,द्वितीय- युवराज संदीप धुरी -कळसुलकर इंग्लिश स्कूल सावंतवाडी,तृतीय- श्रद्धा किसन वारंग-लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली.
दिव्यांग विद्यार्थी प्रतिकृती माध्यमिक गट -
प्रथम -ओमकार पंकज राणे- प्रगत विद्यामंदिर रामगड, द्वितीय- ओम चंद्रकांत शेटये- नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ, तृतीय -आर्या अनंत मयेकर शिवाजी इंग्लिश स्कूल पणदुर तिठा.
प्राथमिक शिक्षक प्रतिकृती-
प्रथम -श्रीम.अनुराधा विठ्ठल सावंत- जि प प्राथमिक शाळा तळवडे नं.8,द्वितीय-श्रीम.अर्चना रामचंद्र कोरगावकर- जि प केंद्रशाळा वेतुरे नं. 1, तृतीय श्री.सिताराम दत्ताराम पारधीये- जि प केंद्रशाळा साळिस्ते.
माध्यमिक शिक्षक प्रतिकृती -
प्रथम- श्री चैतन्य महादेव सुकी- श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे, द्वितीय- श्री जयवंत कृष्णा तायशेटे मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी,तृतीय -श्रीम.प्रज्ञा अभिनय आजगावकर -न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कसाल ता.कुडाळ.
प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर- प्रथम -श्री.अनिल मारुती चव्हाण अ.वि.फडणीस माध्यमिक विद्यामंदिर घोणसरी कणकवली,द्वितीय- श्री अतुल विजय उमळकर- कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कुडाळ,तृतीय -श्री सूर्यकांत गजानन चव्हाण -खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल, डॉ.व्ही.के.तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा.










