विद्या विकास हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: December 18, 2025 18:43 PM
views 22  views

सावंतवाडी : आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल च्या वार्षिक दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण होण्यासाठी तसेच  खेळातून मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी  या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे तसेच शाळेद्वारे मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक शिरीष नाईक यांनी सांगितले.

यावेळी प्रशालेच्या विद्यार्थांनी विविध स्पर्धांमध्ये सांघिक तसेच वैयक्तिक क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन उत्तम कामगिरी केली .मुलांनी सुद्धा मोठ्या उत्साहाने स्पर्धेत भाग घेत आपले कौशल्य दाखविले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक शिरीष नाईक,क्रीडा शिक्षक अनिल नाईक, तानाजी वरक, देवयानी चव्हाण ,श्रद्धा मुळीक, मिताली नाईक,कृपा नेमळेकर,तानाजी खोत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.