
सावंतवाडी : फलटण येथील स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलनात्त सावंतवाडी येथील कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या 'जपलाला कनवटीचा' या मालवणी काव्यसंग्रहाला 'स्वदेशी भारत सन्मान' प्रदान करण्यात आला. श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान, आसू आणि स्वदेशी भारत बचतगट, संकुडेमळा यांच्यावतीने आसू-फलटण येथे स्वदेशी भारत राज्यस्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी संभाजी घाडगे, कवी हनुमंत चांदुगडे, अरविंद मेहता आदी उपस्थित होते.
कवयित्री कल्पना बांदेकर यांच्या 'जपलाला कनवटीचा' या काव्यसंग्रहात मालवणी भाषेतील एकूण ५० कविता आहेत. मालवणी माणसे, त्यांचे जगणे, बोलाचाली, मालवणी मुलखातील श्रद्धा-अंधश्रद्धा आदींशी संबंधित कविता या संग्रहात समाविष्ट आहेत. बांदेकर यांनी अनेक एकांकिकांमधून अभिनय करत आजवर अनेक पारितोषिके पटकावली आहेत. अनेक स्पर्धांमधून कविता सादर केल्या आहेत. बालनाट्य चळवळीतही दीर्घकाळ काम केले आहेत. आजवर त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. युवा साहित्य मंच, कोकण मराठी साहित्य परिषद या साहित्य चळवळीतही त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे.










