
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या 'सेवा - कार्यशिक्षण व कृतीद्वारे सामाजिक सशक्तीकरण' या उपक्रमांतर्गत कुडाळ येथील जिव्हाळा आश्रम तसेच पणदूर येथील संविता आश्रमाला भेट दिली. हा उपक्रम इयत्ता ९वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई बोर्डाच्या हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन या विषया अंतर्गत राबविला जातो. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये समाजभान, सहानुभूती, संघभावना, स्वयंशिस्त व सामाजिक जबाबदारी हे गुण विकसित करण्यात येतात. आश्रम भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी तेथील रहिवाशांशी संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन गरजा समजून घेतल्या आणि स्वच्छता, सेवा व मदतीच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. फळे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही केले. यातून विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठा व सामाजिक संवेदनशीलता यांचे महत्त्व समजले. यावेळी उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक व सोबत श्वेता खानोलकर, सचिन हरमलकर, संदीप पेडणेकर आदी शिक्षकवर्ग उपस्थित होत.










