अॅड. मेहमूद रखांजी यांना बार कॉउंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवाची सनद प्राप्त

Edited by: विनायक गांवस
Published on: December 16, 2025 17:16 PM
views 67  views

सावंतवाडी : येथील अग्रगण्य संगणक प्रशिक्षण संस्था, एक्सेल कॉम्पुटर अकॅडमीचे संचालक, संस्थापक ऍडव्होकेट मेहमूद अब्दुललतिफ रखांजी यांनी एल.एल.बी. पदवी मिळवली होती. आताच ६ डिसेम्बर २०२५ रोजी त्यांना बार कॉउंसिल ऑफ महाराष्ट्र व गोवा, हायकोर्ट मुंबईची सनद प्राप्त झाली आहे. गेली तीस वर्षे ते संगणक (आयटी) क्षेत्रात कार्यरत आहेत. आपली प्रॅक्टिस सायबर, सोशल मीडिया, डिजिटल क्राईम क्षेत्रात करण्याचा त्यांचा मानस आहे. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्राचे नामांकित कॉलेज गव्हर्मेन्ट ला कॉलेज, मुंबईशी सलंगनित डिप्लोमा इन सायबर ला कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे . आपण सामान्य नागरिक. प्रशासन यांना सेवाभावी उद्देशाने सेवा देण्याचा प्रयत्न राहील, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.