
सावंतवाडी : 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनांतर्गत आयोजित विविध तालुकास्तरीय स्पर्धा निरवडे येथे पार पडल्या. यामध्ये प्राथमिक वयोगटासाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सिं. जि. शि. प्र. मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु. उमेझा शेख हिने 'प्रदूषण: एक जागतिक समस्या' या विषयावर अभ्यासपूर्ण वक्तृत्व ओघवत्या शैलीत सादर करून सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले.
त्याचप्रमाणे माध्यमिक गटातून कु. नेहल मठकर हिने 'हरित ऊर्जा: उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल' या विषयावर अभ्यासपूर्ण वक्तृत्व सादर करून तालुक्यात द्वितीय क्रमांक संपादित केला. सदर स्पर्धेसाठी विज्ञान शिक्षिका श्रीम. फरजाना मुल्ला व श्रीम.साक्षी सावंत यांनी मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले.










