
सावंतवाडी : भाजप आणि शिवसेना निवडणूकीत नंतर हे दोघेही गुलाल एकत्र उढळतील. ही भांडण जनतेची दिशाभूल करण्यासाठी आहेत. राज्यात, केंद्रात हे एकत्र आहेत. लॅण्डमाफिया कोण हे जाहीर होण आवश्यक आहे. संजू परब यांनी तशी टीका दीपक केसरकरांवरही केलेली. तसेच पालकमंत्री नितेश राणे देखील राजकारणासाठी रंग बदलणारे आहेत असा टोला उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, विकासाच्या मुद्यावर हिंमत असेल तर निवडून या. सत्ता भोगूनही यांना धनशक्तीचा वापर करावा लागतो. मोती तलाव, लॅण्ड माफियांच्या फक्त आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी अडकले आहेत. पर्यटन प्रकल्प बंद पडलेत. यांच्याकडे सत्ता का द्यावी याचा विचार जनतेनं केला पाहिजे असं आवाहन उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी केल. विकासकामात भ्रष्टाचार करून हे पैसा वाटत आहेत. त्यामुळे जनतेने हे ओळखून यांना पुन्हा खिशात पैसा घालण्यास देऊ नये. आमचे सर्व उमेदवार भ्रष्टाचार मुक्त आहेत. आरोप त्यांच्यावर नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आमच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी निशांत तोरसकर व पदाधिकारी उपस्थित होते.










