
सावंतवाडी : पाच वर्ष जो उमेदवार मदतीला धावून येईल त्याला संधी द्या, असं आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केले. यावेळी ॲड. राजू कासकर उपस्थित होते. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पैशांचा पाऊस शहरात पडत आहे. ही निवडणूक नगरपरिषदेची आहे की महानगरपालिकेची ? मतांची भिक मागायची व ती खरेदी करायची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली आहे असा टोलाही त्यांनी लगावला.










