
सावंतवाडी : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बाजारपेठ फिरत गाठीभेटीवर भर दिला. प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी त्यांनी नागरिकांच्या भेटी घेण्यावर भर दिला. शहरातील दुकानासह तलव काठी जात त्यांनी नागरिकांच्या भेटी घेण्यावर भर दिला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, महिला शहरप्रमुख भारती मोरे, परिक्षीत मांजरेकर, क्लेटस फर्नांडिस आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.










