
सावंतवाडी : धनशक्तीच मोठ्या प्रमाणात वाटप होत आहे. विकासाच्या गोष्टी करणाऱ्यांना पैसे वाटायची वेळ आली आहे. दीपक केसरकर यांनीही ते जाहीर केलय. त्यांचे पैसे घ्या पण मतदान करू नका म्हणून आवाहन केले. आज हे देखील पैसे वाटू लागलेत असा टोला उबाठा शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला.
ते म्हणाले, मतदारांना आमिष दिली जात आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्याच काम करत आहे. सत्ताधारी पक्षाचे राज्यस्तरीय नेते येऊ लागलेत. एवढा विकास केला तर राज्यस्तरीय नेत्यांना सभेसाठी का यावं लागतं ? असा सवाल केला. समोर पराभव दिसू लागल्याने एकनाथ शिंदेंना यावं लागतं आहे. केसरकरांच्या राजकीय रिटायर्डमेंटची सभा घ्यायला येत आहेत असा आरोप त्यांनी केला. तसेच आमचे उमेदवार जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. निष्ठावंत, जनतेशी प्रामाणिक लोकांना संधी द्यावी असे आवाहन केले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत कासार, अशोक धुरी आदी उपस्थित होते.










