
सावंतवाडी : प्रभाग क्रमांक ५ मध्ये अपक्ष उमेदवार बबलू मिशाळ यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. शेकडो समर्थकांसह त्यांनी आपल्या प्रभागात जोरदार प्रचार केला. यावेळी श्री. मिशाळ यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रीय पक्षांकडून धनशक्तीचा वापर होत असला तरी जनशक्तीच प्रेम माझ्यासह आहे. जनता मला निश्चितच निवडून देईल, माझा आईचा वारसा मला असून जनतेच्या सेवेसाठी मी कटीबद्ध आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी चेतन देसाई, बंटी माठेकर, अनिल चिटणीस, प्रिती मिशाळ, सुनिल मिशाळ, गौतम माठेकर, पार्थिल माठेकर, सौ. चव्हाण आदींसह मिशाळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते.










