
सावंतवाडी : नगराध्यक्षपदासाठीच्या अपक्ष उमेदवार माजी उपनगराध्यक्षा सौ अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात जोरदार प्रचार करत आघाडी घेतली आहे. जनता आपल्याला निश्चितच विजयी करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरगावकर यांनी संपूर्ण शहर पिंजून काढलं. घरोघरी जात आपला प्रचार केला. तसेच डिजीटल आणि हायटेक प्रचारात देखील त्या पक्षांच्या तोडीस तोड उतरल्या आहेत. यावेळी त्यांनी जनतेचा आपल्याला प्रतिसाद आहे. विकास आणि रोजगारवर माझा भर आहे. प्रशासनाचा अनुभव मला आहे. त्यामुळे निश्चितच जनता मला निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी अखिलेश कोरगावकर, व्यंकटेश शेट आदींसह समर्थक उपस्थित होते.










