
सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानला मोठा इतिहास आहे. मोती तलाव सावंतवाडीची शान आहे. लोकांच्या आशीर्वादाने नगराध्यक्ष झाल्यास ही सुंदरता अधिक वाढण्यावर भर राहील हा माझा शब्द आहे, असं मत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी कॉर्नर सभा घेतली. त्या पुढे म्हणाल्या, शहरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपची ताकद आमच्यासह आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. घरोघरी फिरल्यावर काही गोष्टी लक्षात आल्यात. त्यामुळे सुखी आणि स्वच्छ सावंतवाडी देण्यासाठी माझा भर राहणार आहे. प्रामाणिक काम करणं माझा उद्देश राहणार आहे. लोकांची सेवा करण माझा हेतू राहिलं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, सौ. वेदीका परब, सौ. दौडीया, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










