मदर क्वीन्समध्ये स्टोरी टेलिंग स्पर्धेला प्रतिसाद

Edited by: विनायक गांवस
Published on: November 26, 2025 14:14 PM
views 63  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडी या प्रशालेत इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांसाठी स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे एकूण 67 विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात व आत्मविश्वासाने कथाकथन सादर केले.

त्याचप्रमाणे इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलेल्या विषयांवर सहभागी 16 स्पर्धकांनी उत्कृष्ट एकपात्री अभिनय सादर करून स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या समर्थ गवंडी यांनी सर्व विद्यार्थ्यांना अभिनयातील बारकाव्यांबद्दल व आवाजाच्या वापराबद्दल मार्गदर्शन केले तसेच त्यांनी दशावतारातील 'बिलीमारो' हे पात्र आपल्या दर्जेदार अभिनयाने रंगमंचावर उत्कृष्टपणे वठवून उपस्थित सर्व विद्यार्थी व प्रेक्षकांची मने जिंकली.

या स्पर्धांच्या आयोजनाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले,कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई , मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत ,डॉ.सतीश सावंत ,मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.