
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी माजी उप नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी भाजप तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार श्रीधर पाटील, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे त्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी श्रीरंग आचार्य, माजी नगरसेवक ॲड पुष्पलता कोरगावर, व्यंकटेश शेट, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर आदी उपस्थित होते.










