
सावंतवाडी : जिल्हा कारागृहाच्या मुख्य संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या सुमारे ४ कोटी ५ लक्ष ८० हजार २१६ रुपये एवढया रकमेच्या कामास राज्य शासनाच्या गृह विभागाकडून प्रशासकीय मंजूरी प्राप्त झाली आहे. माजी मंत्री , आमदार दीपक केसरकर यांच्या सुचनेनुसार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी तसा परीपुर्ण प्रस्ताव तांत्रिक मान्यतेसह दिला होता. त्यास मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती केसरकर यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलीय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जिल्हा कारागृहाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग पावसाळयामध्ये कोसळल्याने येथील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या संदर्भात या संरक्षक भिंतीचे शासनाने स्ट्रक्चलर ऑडीट करुन याबाबत सदर भिंत ही सुमारे १४३ वर्ष जुनी असल्याने सदर संरक्षण भिंतीस ठीकठीकाणी भेगा गेल्याने नादुरुस्त जीर्ण झालेली असुन असुरक्षित असल्या कारणाने कारागृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन अस्तित्वातील जीर्ण झालेली संरक्षक भिंत पाडुन त्याठिकाणी नव्याने आर.सी.सी. प्रकारची भिंत बांधणेबाबत अहवाल सादर केल्यानुसार दिपक केसरकर यांच्या सुचनेनुसार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांनी तसा परीपुर्ण प्रस्ताव तांत्रीक मान्यतेसह अप्पर पोलीस महांसचालक व महानिरिक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांजकडे सादर केला व त्यांनी सदर प्रस्ताव शासनास सादर केलेनुसार त्यास राज्याच्या गृह विभागाने दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन निर्णय क्र. जेएलएस-११२५/ प्र.कृ-२२९/ तुरुंग-२ अन्वये ४ कोटी ४ लक्ष ८० हजार २१६ रुपये एवढया रकमेच्या कामास प्रशासकीय मंजूरी देवून काम मंजूर करण्यात आले. या मंजुर कामामुळे सावंतवाडी सावंतवाडी संस्थानच्या ऐतिहासिक इमारतींचा वारसा जपला जाणार आहे. काम मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दिपक केसरकर यांनी आभार व्यक्त केले.










