
सावंतवाडी : आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांनी उमेदवारीसाठी आग्रही मागणी केली आहे.
मडगावकर यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने संधी दिल्यास, सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. मोहिनी मडगावकर यांनी भाजप पक्षात सक्रियपणे काम केले आहे. त्यांनी दोन वेळा महिला अध्यक्षा म्हणून अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कामाची दखल घेत आमदार चित्रा वाघ यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेश सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली. सध्या त्या जिल्हा कार्यकारिणीत कार्यरत आहेत










