सोनुर्ली देवी माऊलीचं केसरकरांनी घेतलं दर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: November 06, 2025 16:20 PM
views 62  views

सावंतवाडी : प्रतिपंढरपूर सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दर्शन घेतले. आज जत्रोत्सवाला त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी देवस्थान समितीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. 

यावेळी श्री. केसरकर यांनी सावंतवाडी मतदारसंघातील जनतेसह महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी ठेवण्याचं साकडं घातलं. उपस्थित भाविकांना त्यांनी जत्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.