विरोधकांची परिस्थिती अवघड : राहुल नार्वेकर

Edited by: विनायक गांवस
Published on: November 05, 2025 20:06 PM
views 41  views

सावंतवाडी  :  सावंतवाडी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सावंतवाडीत करण्यात आलं.  यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा प्रदेशाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. भाजप विश्वातील सर्वात मोठी पार्टी आहे. जनसेवेसाठी कार्यालय सुरू करून सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना दिला जाणार आहे. ३ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच कमळ दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चारही नगरपरिषदेत भाजपला यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

भाजपने जिल्ह्यात ताकद वाढवली आहे. त्यामुळे विरोधकांची परिस्थिती अवघड झाली आहे. भाजपचा नगराध्यक्ष चारही नगरपरिषदेत बसवण्याच काम आपणाला करायचं आहे. सिंधुदुर्गचा भुमिपुत्र असल्यानं विशेष प्रेम इथल्या मातीवर आहे. मातीच ऋण फेडण्यासाठी मी कार्यरत आहे. अनेक रत्न या जिल्ह्यान देशाला दिलीत. राज्यात आणि देशात कमळ पुढे जात राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २०२४७ ला भारत डेव्हलप कंट्री असेल. नरेंद्र मोदींच स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप विचारांचे उमेदवार विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.