
सावंतवाडी : सावंतवाडी भाजपच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सावंतवाडीत करण्यात आलं. यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, भाजपची अत्यंत चांगली स्थिती आहे. लोकसभा, विधानसभेला युती म्हणून काम करत मताधिक्य मिळवून दिलं. जिल्ह्यात भाजपन स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ही निवडणूक मोठ्या मताधिक्यान आपण जिंकू शकतो. त्यासाठी स्वबळावर लढण्याची अनुमती आम्हाला द्यावी, कामाला सुरुवात आम्ही केली आहे असही त्यांनी सांगितलं.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवा नेते विशाल परब, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, सौ. वेदिका परब, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवराज लखमराजे भोंसले, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, अशोक सावंत, सुधीर आडिवरेकर, रणजीत देसाई, राजू राऊळ, संदिप गावडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.










