भाजप उमेदवारांसाठी रणांगणात उतरणार !

प्रचारासाठी 'डोअर टू डोअर' जाणार : विशाल परब
Edited by: विनायक गांवस
Published on: November 05, 2025 14:47 PM
views 368  views

सावंतवाडी : भाजपच्या माध्यमातून विकासाच व्हिजन आम्ही घेऊन जाणार आहोत. भाजपचा एक सैनिक म्हणून उमेदवारांसोबत मी उभा राहणार असून घरोघरी प्रचारासाठी जाणार आहे, रणांगणात उतरणार आहे अस मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले.

 परब म्हणाले की, आज आढावा बैठक होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे आज उपस्थित राहणार आहे. पक्षाच सुसज्ज कार्यालय उभं राहतं असून याचा शुभारंभ होणार आहे. आम्ही भाजपचे, जनतेचे सैनिक आहोत. अनेक जण भाजपात येण्यास इच्छुक आहेत. सावंतवाडी, वेंगुर्ला नगरपरिषदेत  मी फिरणार आहे. रोजगार, आरोग्य प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जनतेला काय देऊ शकतो ? यावर आमचा फोकस आहे. इतर शहरांच्या तुलनेत आपली शहर जावीत यासाठी माझा प्रयत्न आहे‌. भाजपची ताकद इतरांपेक्षा मोठी आहे. आमच्याकडे इच्छुकांची संख्याही जास्त आहे. आमच्या पक्षाची ताकद विरोधकांपेक्षा फार मोठी आहे, असं त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आम्ही स्वबळाचा नारा दिला आहे. म्हणून ते स्वबळाचा नारा देत आहेत अस विधान वेंगुर्ला माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले. यावेळी भाजप युवा नेते विशाल परब, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, केतन आजगावकर, अमेय पै, अमित परब, दिनेश सावंत आदी उपस्थित होते.