
सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीचे निवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी राजन धोंडू पटेकर (६५, रा. मळगांव ) यांचे मंगळवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना सावंतवाडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. कला व क्रीडा क्षेत्रात त्यांचा वावर होता. मळगाव येथील परिमल नाट्य मंडळाच्या माध्यमातून त्यांनी हौशी नाटकांमध्ये विविध भूमिका साकार केल्या होत्या. सामाजिक क्षेत्रातही ते अग्रभागी असायचे. सदैव हसतमुख व मनमिळाऊ अशा स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, भाऊ, भावजय, पुतण्या असा मोठा परिवार आहे. अमेय उर्फ धनराज व गौरव पटेकर यांचे ते वडील होत.













