
सावंतवाडी : परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसामुळे हातातोंडांशी आलेल्या भात पिकावरून पाणी गेल्यामुळे भात पिक कुजून गेले आहे. तसेच कापून वाळत घातलेल्या भाताला कोंब येऊ लागले आहेत.
काही ठिकाणी वाफ्या मध्ये वाळत घातलेली आडवे पाण्यामध्ये तारांगताना दिसत आहेत. उभ्या असलेल्या भाताच्या लोंबीलाही कोंब येऊ लागले आहेत. कापणीच्या वेळी परतीच्या पावसाचे प्रमाण अति असल्यामुळे भात आणि नाचणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.










