
सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी आणि अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी सायंकाळी आरोग्य विषयक जनहित याचिका विनामूल्य लढविणारे कळसुलीकर शाळेचे माजी विद्यार्थी वकिल महेश राऊळ यांचा कृतज्ञता गौरव सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे.
कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परुळकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकतेँ, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलैश पै, अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग चे सचिव अण्णा म्हापसेकर यांनी केले आहे. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या कळसुलकर शाळेचे हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात शाळेचे माजी विद्यार्थी वकील श्री.राऊळ यांनी संपूर्णतः सामाजिक भावनेतून विनामूल्य अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग ची जनहित याचिका लढवली आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य गोर, गरिब नागरिकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याबद्दल कृतज्ञता म्हणून हा कृतज्ञता गौरव सोहळा आयोजित केला आहे.










