आरोंदा चेक पोस्टवर बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई

Edited by: विनायक गांवस
Published on: October 03, 2025 19:49 PM
views 92  views

सावंतवाडी : आरोंदा चेक पोस्ट येथे गोवा राज्यातून अवैध मार्गाने मालवणकडे दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना पोलीसांनी पकडले असून त्यांच्याकडून ६५ हजार, ६००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वाजण्याच्या सुमारास आरोंदा चेक पोस्टवर पोलिसांनी ही कारवाई केली. बाळकृष्ण महादेव बांदिवडेकर (वय ५८, रा. बांदिवडे, ता. मालवण) आणि संजय वसंत जाधव (वय ४८, रा. आडवली, ता. मालवण) हे दोघे आरोपी बजाज मोटरसायकल क्रमांक MH 07 AR 7577 वरून गोवा बनावटीची दारू गोवा ते मालवण अशी अवैध वाहतूक करत असताना रंगेहाथ पकडले गेले. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ हजार ६००/- किमतीची गोवा बनावटीची दारू आणि ५० हजार किमतीची मोटरसायकल असा एकूण ६५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.ही कारवाई महिला पोलीस अंमलदार योगिता राणे, एएसआय अरवारी, आणि हवालदार जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.