
सावंतवाडी : कोलगाव आयटीआय समोरील भगदाड पडलेल्या ठिकाणी दोन दिवसात काम चालू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.
कोलगाव आयटीआय जुन्या हायवेवर भगदाड पडलं आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी "सावधान काम चालू आहे" असा सूचना फलक लावण्यात आला आहे. परंतु, काम पूर्णपणे बंद आहे. एकतर हा हायवे अरुंद असल्यामुळे या हायवेवर अपघात होत असतात. त्यात रस्त्याच्या मध्यभागी चिरे-दगड व ड्रम लावून ठेवल्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग बिनधास्त आहे. येत्या दोन दिवसात रस्त्याचं काम सुरू न केल्यास बांधकाम विभागाच्या समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांनी दिला आहे.










