
सावंतवाडी : माडखोल सेवा संघाने लोकसहभागातून घेतलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते बाळा गावकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून माडखोल सेवा संघाने लोकसहभागातून रुग्णवाहिकेसाठी घेतलेला पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे. तसेच या सेवाभावी कार्याला माडखोलवासीयांसह इतरांनी उत्स्फूर्त प्रतिसादही न भूतो न भविष्यती असाच असून त्यामुळेच अल्पावधीत रुग्णवाहिकेचे स्वप्न साकारले. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून
माडखोल सारख्या ग्रामीण भागाच्या आरोग्य सेवेसाठी आदर्शवत सेवाभावी कार्य घडणार आहे असे प्रतिपादन ओटवणे येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा गावकर यांनी केले. यावेळी देवस्थानचे मानकरी चंद्रकांत म्हालटकर, दशरथ राऊळ, तात्या राऊळ, ज्ञानू तेली, संतोष गावडे, तुकाराम घाडी, नाना मेस्त्री, विश्राम लातये, अशोक सावंत, प्रकाश नाईक, सखाराम राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, विजय बंड, संतोष राऊळ, शंकर राऊळ, ज्ञानदेव राऊळ, रवी राऊळ, नारायण राऊळ, सुयोग राऊळ, पोलीस पाटील उदय राऊत, माडखोल माजी सैनिक संघटनेचे मसाजी राऊळ, जगन्नाथ परब, अरुण शिर्के, सहदेव राऊळ, मुकेश राऊळ, उमेश कारीवडेकर, शंकर राऊळ, तेजकुमार राऊळ, माडखोल सेवा संघाचे अध्यक्ष रवींद्र राऊळ, उपाध्यक्ष सुनिल केसरकर, सचिव अँड सुरेश आडेलकर, लक्ष्मण आडेलकर, सदस्य सुबोध राऊळ, विजय राऊळ, संजय लाड, आनंद राऊळ, मेघनाथ पालव, आप्पा राऊळ, प्रमोद राऊळ, सुदाम पालव, विष्णू राऊळ, तुकाराम लाड, बाबा लातये, अनिल परब, भिकाजी जाधव, भाऊ कोळमेकर, प्रथमेश धुरी, स्वप्निल लातये, बाळू शिरसाट आदी उपस्थित होते.
यावेळी सुरेश आडेलकर यांनी रुग्णवाहिकेचा संकल्प ते स्वप्न साकार होईपर्यंतचा आढावा घेत लोकसहभागातील ही हक्काची रुग्णवाहिका माडखोल गावासाठी जीवनदायी ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी सुबोध राऊळ यांनी या रुग्णवाहिकेमुळे माडखोल गावात इतिहास घडला असे सांगून परोपकाराच्या जाणीवेतून समाजातील सर्व घटकांनी या रुग्णवाहिकेसाठी योगदान दिल्यामुळेच रुग्णवाहिकेसाठी तब्बल १२ लाखाहून अधिक लोकवर्गणी गोळा झाल्याचे सांगितले. यावेळी रवी राऊळ यांनी या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून माडखोल परिसरातील अत्यवस्थ व आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना लाभ होणार असून माडखोल सेवा संघाच्या माध्यमातून गावात आरोग्य विषयक तसेच इतर शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर केले. अरुण शिर्के यांनी माडखोल सेवा संघाच्या आरोग्य विषयक उपक्रमाचे कौतुक करीत या रुग्णवाहिकेमुळे माडखोल हे गाव स्वतःची रुग्णवाहिका असणारे गाव ठरणार असल्याचे सांगितले. सहदेव राऊळ यांनी माडखोल परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अनेकवेळा रुग्णांची गैरसोय होते. त्यामुळे आपल्या परिसरातील लोकांच्या सोयीसाठी हक्काची रुग्णवाहिका असावी या उद्देशाने माडखोल सेवा संघाने लोकसहभागातून केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मेघनाथ पालव यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले तर माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. गावचे ग्रामदैवत श्री पावणाई मंदिर येथे झालेल्या या लोकार्पण सोहळ्याला माडखोल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुबोध राहुल सुत्रसंचालन लखन आडेलकर तर आभार विष्णू राऊळ यांनी मानले.