
सावंतवाडी : समग्र शिक्षा शिक्षण विभाग - प्राथमिक, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या 'महावाचन उत्सव - 2024 पुस्तक वाचन - अभिप्राय लेखन मूल्यांकनामध्ये' मिलाग्रीस हायस्कूल, सावंतवाडी प्रशालेची विद्यार्थिनी कु. तनया वासुदेव सावंत हिने सावंतवाडी तालुकास्तरावर इयत्ता नववी ते बारावी या गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशाबद्दल तिला प्रशस्तीपत्रक, पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना, पर्यवेक्षिका श्रीम. संध्या मुणगेकर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.