जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिकेची प्रभावी सेवा

Edited by: विनायक गांवस
Published on: July 13, 2025 11:16 AM
views 67  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिकेने प्रभावीपणे सेवा दिली आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील गंभीर आणि  अतिगंभीर रुग्णना गोल्डन अवर्समध्ये वैद्यकीय सेवा पुरवली जात असून मागच्या दहा वर्षात सिंधुदुर्गातील १ लाख ६० हजार ५३३ रूग्णांना ही मोफत सेवा दिली आहे.

रूग्णांना गोल्डन अवरमध्ये उपचार देण्यासाठी रुग्णवाहिकेत प्रगत उपकरणे, औषधे आणि प्रशिक्षित डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे मोठा फायदा होत असून सेवा मोफत असल्याने आर्थिक भुर्दंड देखील वाचतो. आजवर २४४ प्रसृती या रूग्णवाहिकेतच झाल्या आहेत. ६ हजार ९४३ अपघातग्रस्त रूग्णांसाठी, १ लाख ८ हजार ४२७ सर्वसाधारण रूग्णांसाठी १०८ मदतीला आली आहे. राज्यात १ कोटी १० लाख ८१ हजार ३०३ रूग्णांना मोफत सेवा १०८ न पुरवण्याची माहिती १०८ चे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांनी दिली.