
सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग तर्फे लवकरच कोमसाप सदस्यांसहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार असून या स्नेहमेळाव्याला कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक उपस्थित राहणार आहेत. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुस्तक प्रकाशित झालेल्या साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
या पुस्तक प्रदर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिकांनी आपल्या प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर यांच्याकडे सुपूर्द कराव्यात. पुस्तक प्रदर्शनासाठी पुस्तके उपलब्ध करून देणाऱ्या सर्व साहित्यिकांचा स्नेहमेळाव्यात यथोचित गौरव करण्यात येणार आहे. स्नेहमेळाव्याची तारीख कळविण्यात येणार असून जुलै शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याकरिता आपली प्रकाशित पुस्तके देऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री. पटेकर यांनी केले आहे.