बळींची संख्या वाढतीच ; वीज वितरण धारेवर

Edited by:
Published on: July 08, 2025 19:25 PM
views 149  views

सावंतवाडी : असनिये वायंगणवाडी येथे वीज वाहिनी कोसळल्याने शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात शेतकऱ्यासह इतर जनावरे बालंबाल बचावली. असनिये सरपंच रेश्मा सावंत, पोलीस पाटील विनायक कोळकटे यांच्यासह ग्रामस्थांनी या ठिकाणी धाव घेतली असून महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे.

या मुख्य वीज वाहिनीचे काम चार दिवसांपूर्वी करण्यात आले होते. आज सायंकाळी हीच मुख्य वीज वाहिनी वायंगणवाडी येथे कोसळली. यामध्ये शॉक लागून बैलाचा मृत्यू झाला असून शेतकरी लक्ष्मण वासुदेव सावंत यांच्यासह इतर जनावरे प्रसंगवधान राखल्याने बचावली. महावितरणचे कनिष्ठ अभियंता श्री ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना ग्रामस्थांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले.