
सावंतवाडी : येथील माठेवाडा येथे राहणाऱ्या विवाहिता प्रिया चव्हाण यांनी नुकतीच आत्महत्या केली. त्यांचे माहेर कलंबिस्त गावाचे आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या माहेरी जाऊन त्यांच्या वडीलांसह संपूर्ण तावडे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी उबाठा शिवसेनेचे जिल्हाट्ऊ बाबुराव धुरी, सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, अशोक धुरी, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मायकल डिसोजा, शहर प्रमुख शब्बीर मणियार, शैलेश गौंडळकर, अनुप नाईक आदी उपस्थित होते.