
सावंतवाडी : आंबोली घाटात एका कारवरील नियंत्रण सुटल्याने तिचा अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडीचे नुकसान झाले आहे. ही घटना आंबोली घाटात घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला गेली. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदत केली. त्यांच्या सहकार्याने गाडी बाहेर काढण्यात आली. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही.