
सावंतवाडी : तालुक्यातील गुलाबी तिठा परिसरात दुपारच्या सुमारास अडीच फूट लांबीचा एक नाग आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मोरजकर यांच्या घराच्या जवळ हा नाग दिसला होता.
नाग दिसताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ सर्पमित्रांना याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र तुषार विचारे आणि राजन निब्रे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोणतीही घाई न करता आणि योग्य ती खबरदारी घेऊन या नागाला सुरक्षितपणे पकडले. सापाला कोणतीही इजा होऊ न देता त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.