
सावंतवाडी : यशराज मल्टीस्पेशाालिटी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी गोरगरीब रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी डॉ. नवांगुळ करत असलेली धडपड कौतुकास्पद असल्याचे मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.
आम. केसरकर पुढे म्हणाले, आजारी पडल्यानंतर सगळी बचत संपून जाते. अशावेळी शासनाच्या योजना फायद्याच्या ठरतात. सरकारनं १०० टक्के लोकांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात प्रभावीपणे ही योजना लागू आहे. गरिब रुग्णांची सेवा डॉ. नवांगुळ यांच्या माध्यमातून होणार आहे. सावंतवाडीच मल्टीस्पेशालिटी निधी मंजूर असताना तांत्रिक बाबतीत अडल आहे. या संदर्भात राजघराण्याची भेट घेतली आहे. डॉक्टरांची नियुक्ती करूनही ते इथे यायला बघत नाहीत. इथला परिसर किती सुंदर आहे याची कल्पना त्यांना नसते. यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तसेच टेस्ट ट्यूब बेबी सारखी संकल्पना डॉ. नवांगुळ यांनी सावंतवाडीत उपलब्ध करून दिली आहे. महिलांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे असल्याचे मत व्यक्त केले.
यशराज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने आजवर जिल्ह्यातील जनतेला आधुनिक आरोग्य सेवा पुरवत रूग्णांना सेवा दिली आहे. आता एकत्रीत आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू झाल्या आहेत. याचा फायदा जिल्ह्यातील रूग्णांना होणार आहे. श्री. केसरकर यांच्या हस्ते फित कापुन या कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, डॉ. मिलिंद खानोलकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, म.फुले योजनेचे डॉ. प्रवीण गोरूले, डॉ. संदीप सावंत आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. नवांगुळ म्हणाले, ही योजना आमच्या हॉस्पिटलला मिळण्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आबिटकर यांच्याकडे त्यांनी पत्र दिल्यानंतर आम्हाला ही मंजूरी मिळाली. ही योजना येथील लोकांसाठी फार महत्त्वाची आहे. मोठ्या शस्त्रक्रिया करण यामुळे शक्य होणार आहे. यावेळी ॲड. नकुल पार्सेकर यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, सावंतवाडीत आता तीन ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू झाली आहे. डॉ. नवांगुळ यांनी यासाठी बरेच प्रयत्न केल्याचे सांगितले. आभार योजनेचे सिंधुदुर्ग समन्वयक डॉ. प्रवीण गोरूले यांनी मानले. याप्रसंगी माजी नगरसेवक उमाकांत वारंग, डॉ गोविंद जाधव, डॉ.संजय दळवी, डॉ. धीरज सावंत, डॉ. विनय निर्मल, डॉ. विकास बर्वे,डॉ. सूरज देस्कर, सौ.मनिषा नवांगुळ, डॉ. राजशेखर कार्लेकर, सौ. पार्सेकर आदी उपस्थित होते.